अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांनी खासदार श्री. डॉ. अमोल कोल्हे यांची भेट घेऊन चर्चा केली.

0
63

कलाकारांच्या प्रलंबित प्रश्नांना सोडविण्यासंदर्भात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांनी खासदार श्री. डॉ. अमोल कोल्हे यांची भेट घेऊन चर्चा केली.
या चर्चेदरम्यान कलाकारांच्या आरोग्य, अर्थीक मदत, पेन्शन, भविष्यातील योजनासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी चित्रशारदा च्या व्यवस्थापकीय संपादिका अश्विनी धायगुडे कोळेकर उपस्थित होत्या.
यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मुखपत्र चित्रशारदा चा खासदार कोल्हे यांच्यावरील विशेष अंक त्यांना भेट देण्यात आला.
यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी कलाकारांचे प्रश्न पुढाकार घेऊन सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.