महामंडळतर्फे उपोषण ठिय्या आंदोलन

0
2

कोल्हापूर शहराचा अस्मितेचा प्रश्न असलेल्या आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या वैभवशाली त्याचे साक्षीदार असलेला ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओचे अस्तित्व जतन करण्याकरता आणि टिकवण्यासाठी महामंडळतर्फे उपोषण ठिय्या आंदोलन केले होते.
या सर्वांचा परिणामअंती जयप्रभा स्टुडिओच्या अस्तित्व अबाधित ठेवून शासनाने वर्ग करण्याचे दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी आदेश जारी करण्यात आले होते. त्याचा अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेस जयप्रभा स्टुडिओ ताब्यात घ्यावा असा आशयाचे आदेशही प्राप्त झालेले आहेत. या आदेशास पाच महिने होऊन ही त्यावर ठोस कार्यवाही झाली नाही म्हणून आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे शिष्टमंडळ यांनी आज माननीय आयुक्त के . मंजू लक्ष्मी यांची भेट घेतली जयप्रभा स्टुडिओ हा कोल्हापूरच्या अस्मितेचा भाग असून लवकरात लवकर यावर कोल्हापूर महानगरपालिकेने तोडगा काढून निदान तिथं चित्रीकरण सुरू करावे.शालिनी स्टुडिओ बाबत आरक्षण असलेल्या जागेवर अतिक्रमण होत असून या बाबत मा.आयुक्त यांनी विशेष लक्ष द्यावे असे शिष्ट मंडळ यांनी सांगीतले.
जयप्रभा स्टुडिओ संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करू असे मा. आयुक्त यांनी आश्वासन दिले. या शिष्टंमंडळ मध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष श्री धनाजी यामकर, संचालक रणजित जाधव, सतीश बिडकर, मिलिंद अष्टेकर, बाबा पार्टे ,महेश पन्हाळकर, बाबा लाड, विजय शिंदे, विजय ढेरे , अमर मठपती, सुनील मुसळे, महादेव कल्याणकर, शाम काणे, अरुण चोपदार, सदानंद सूर्यवंशी, रवींद्र बोरगांवकर, सिद्धेश मंगेशकर इत्यादी मान्यवर सभासद उपस्थित होते